
गेले अनेक दिवस vaccination या विषयावर अनेक लेख, jokes, उलटसुलट चर्चा वाचल्यामुळे नकळत vaccination याविषयी भितीयुक्त कुतूहल मनात निर्माण झालं होत आणि अखेर आजचा दिवस उजाडला.
आरोग्य सेतू वर आधीच registration केलं होतं.बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये सकाळी अत्यंत शिस्तबध्द रांग लावण्यात आली होती.रांग पाहून वाटलं, आता किती तास रांगेत उभं राहायला लागतयं कोण जाणे...
सकाळी ९ वाजताच कामाला सुरवात झाली. रांग अगदी पटापट पुढे सरकत होती.आम्ही मुख्य हॉल मधे पोचलो तिथे बसायची सोय होती. सुमारे १० मिनिटातच आमचा नंबर आला आणि आम्ही कॉम्प्युटर entry ला पोचलो. Registrarion केलेला फोन नंबर सांगितला की आपलं registration दिसतं.मग आपला webcam ने फोटो आणि आधार scan होतं.आता मुख्य vaccination !
याविषयी तर काय न काय वाचलं होतं.पण प्रशिक्षित नर्सने vaccination इतकं हळूवारपणे दिलं की काही समजलच नाही.सोबत सगळ्या सूचना अगदी प्रेमाने सांगितल्या जात होत्या. शेेेेकायचं की नाही, paracetamol, crocin कधी घ्यायची इतक्या बारीक सारीक सूचना. Vaccination झालं की आपल्याला १५ मिनिट एका हॉलमध्ये बसवलं जातं आणि मग आपण घरी! ही सगळी procedure निव्वळ ४५ मिनिटात पार पडली आणि तासाभरात आम्ही घरी आलो.
हे इतकं विस्तृतपणे सांगायचं कारण की या सगळ्या procedure मधे इतकी कमालीची शिस्तबद्धता आहे की कुठेही आवाज नाही की गोंधळ नाही.सगळे कर्मचारी व्यवस्थित लक्ष ठेवून नागरिकांना मदत करत होते.सूचना देतानाही आवाजात एक काळजी, आपुलकी जाणवतं होती.
एका centre ला रोज किमान १००० नागरिकांचं लसीकरण होत आहे.(आकड्यांचा अंदाज फारच कमी आहे, फक्त उदाहरणादाखल १०००) इतक्या लोकांशी शांतपणे बोलणं,१००० वेळा त्याच त्याच सूचना देणं याला किती कमालीची सहनशीलता लागत असेल याचा फक्त विचार करा आणि गेले वर्षभर covid patients आणि तत्सम काम सातत्याने सुरू आहेत याचीही नोंद घावी.आम्ही काही vaccination करतानाचे फोटो काढले नाहीत. पण आज त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून धन्यवाद दिले. अगदी security guard पासून सगळ्यांना thank u म्हणताना मनात कौतुक, कृतज्ञता आणि डोळ्यात हलकेच पाणी आलं.
काहीजण म्हणतील,"त्यात काय इतकं? त्यांचं काम आहे ते." होय,लसीकरण हे काम आहे.खरतर या routine कामात बोलताना एकसूरी स्वर जाणवू शकतो.पण प्रत्येकाच्या बोलण्यात जाणवत होती ती आत्मीयता आणि काळजीचा स्वर! हा नक्कीच फक्त कामाचा नाही तर मनाचा,माणुसकीचा भाग आहे. म्हणून त्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक आणि आभार!
आणि हो, vaccination centre वर एक सुजाण नागरिक म्हणून त्या staffला किमान thank u म्हणा आणि बघा, त्यावेळी मास्कच्या पल्याडही त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारं हास्य त्यांचा दिवस कसा प्रसन्न करून जातं!

आणि एक तो संतूर चा joke viral झालेला मध्यंतरी की vaccination centre वरून परत पाठवलं.का तर म्हणे तुम्ही ४५ चे वाटत नाही.म्हणून बायकोने संतूर साबण फेकून दिला.तर एक लक्षात असू द्या virusला संतूरही फसवू शकत नाही बरं का."क्योंकी वो आपकी ना त्वचा का ना ही आपकी उम्र का अंदाजा लगाता है I"
Stay safe, wear mask, keep social distance and get vaccinated.
Think beyond संतूर!
Think beyond संतूर!
अक्षदा Happiness coach
Mail: akshada.vichare@yahoo.com
Wa far chan. Covid warriors are really doing well no doubt. I also experienced the same thing
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिले आहे. अगदी आत्ताच्या परिस्थितीला आवश्यक आहे असे लिखाण करण्याची. good one
उत्तर द्याहटवाखूप छान,मनपा कर्मचारी असल्याचा अभिमान आहे.
उत्तर द्याहटवाKhuptach ritya present kela vatavaran.salute to corona warrriors . Dolya samor chitra ubha rahila👍🏻👍🏻🙏🏻
उत्तर द्याहटवाThank u all ...do share and subscribe for my upcoming blogs
उत्तर द्याहटवाThank u all ...do share and subscribe for my upcoming blogs
उत्तर द्याहटवाGood one. Appreciation, Acknowledgement or कौतुक forms the basis of everything we do – in every area where we are active or where we can have an influence. This motivates them to maintain and improve their great performance. Regards, 🙏
उत्तर द्याहटवा