मुख्य सामग्रीवर वगळा

या प्रश्नाला उत्तर नव्हते....


आज सकाळी caligraphy master अच्युत पालव यांनी स्वलीखित एक संदेश पाठवला.

प्रश्न माझा होता
तरीही उत्तर सापडत नव्हतं

उत्तर सापडलं तेंव्हा
प्रश्नच उरला नव्हता

आणि माझी विचार शृंखला सुरू झाली.आपल्याला रोज काही ना काही प्रश्न पडत असतात, कधी कधी भेडसावत असतात. आता हे प्रश्न पालव सरांनी म्हटल्याप्रमाणे माझे म्हणजे आपले स्वतःचे असतात.कधी ते मोठ्या स्वरूपाचे असतात जसे की नोकरी बदलावी का? तर कधी रोजच्या आयुष्यातले म्हणजे आज भाजी कोणती
करावी ?

काही प्रश्न लगेच सुटतात. जसे भाजी कोणती करावी? तर भाजी वांगी किंवा बटाटा करावी हा प्रश्न पटकन सुटला. नोकरी बदलावी का? हा प्रश्न सुटायला कदाचित ३-४ महीने लागतील. पण काही प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीत.जसे कदाचित आरोग्यविषयक प्रश्न सुटायला नक्कीच जास्त वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाची तीव्रता कदाचित कमी झालेली असते किंवा त्या प्रश्नाचं कारणच निघून गेलेलं असतं.

उत्तर सापडलं तेंव्हा
प्रश्नच उरला नव्हता.

आता हे प्रश्न का पडतात तर मानवी मन विचार करत म्हणून, मानवी मन दुसऱ्याशी तुलना करत म्हणून, मानवाला मन आहे म्हणून. प्रश्न पडणं हे अर्थातच चांगल कारण जर न्यूटनला 'झाडावरून सफरचंद का पडलं' हा प्रश्न पडला नसता तर गुरुत्वार्षणाचा शोधच लागला नसता. प्रश्न पडल्यावर त्यावर आपण कसा विचार करतो यावर तो प्रश्न किती सकस आहे हे समजत.समजा एखादी गोष्ट घडली जस की काही कामात failure आलचं तर आपल्याला प्रश्न पडतो 'का बरं अपयश आलं?'

आता जर पुढचा प्रश्न असेल,"माझ्याच बाबतीत का असं होत? माझ्याच नशीबी अस का ?" तर मग प्रश्नाची दिशा चुकली.कारण ही मालिका काहीच साध्य करत नाही.उलट परिस्थितीला, नशिबाला दोष देत राहते.

पण जर "अपयश कोणत्या कारणाने आलं? यात मी कशी सुधारणा करू?" असे प्रश्न नक्कीच सकारात्मक वाटचाल करतात आणि पुढचं पाऊल जास्त आत्मविश्वासाने पडतं.

प्रश्न लहान असो की मोठा प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतच-ते कधी आपल्याला सापडतं,कधी सापडतं नाही.ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाहीत ते प्रश्न मात्र सोडून द्यावेत. अशा वेळी आहे ती परिस्थिती स्वीकारावी आणि शांतपणे हे गीत ऐकावं,
'या प्रश्नाला उत्तर नव्हते....'
अक्षदा
akshada.vichare@Yahoo.com
fb page: Akkshada Vichare

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...

आनंदाचे ११ मूलमंत्र

मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग.... पण तत्पूर्वी मला सांगा की, स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का? आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का? तुम्हाला एकट,एकाकी वाटत का? मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का? आपल्याला आनंद शोधायला का लागतो? बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय. याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत... १) सूर्यप्रकाशात चाला- सकाळच्या वेळी एक small break ...