लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा.
मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत.
माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
१) विचारांना मूर्त स्वरूप येते -

दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा.
यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे.
२) प्रश्नांची उकल होते -

अनेकदा आपल्या आयुष्यातले प्रश्न आपल्याला भंडावून सोडतात.काही केल्या मार्ग सापडत नाही आणि आयुष्य struck होत.अशा वेळी कागदावर प्रश्न लिहायचा आणि मग याच काय कारण असेल ते लिहायचं.अस करत तोपर्यंत reverse जायचं जेव्हा पुढे प्रश्न न पडता उत्तर मिळतं. उत्तर मिळतं हे नक्की.
३) भावनांना वाट मोकळी होते-
अनेकदा आपण भावना मोकळेपणे बोलू शकत नाही.मैत्रीण,मित्र, मुलं,नवरा कोणाशीच १००% share नाही करता येतं.लेखन यासाठी उत्तम साथीदार आहे.लिहिल्याने मन विचारमुक्त होत, हलकं होत,आनंद मिळतो. हे लेखन फक्त स्वतःसाठी असावं की कोणाशी share करावं हा वैयक्तीक प्रश्न आहे पण लिहावं जरूर.
४) इतरांपर्यंत विचार पोचतात-
४) इतरांपर्यंत विचार पोचतात-

आपले विचार आपण बोलून दाखवतो.पण एक विचार आपण फार फार तर १० व्यक्तींना सांगू शकतो.जास्त व्यक्तींपर्यंत पोचायचं तर मग ते भाषण होईल. आजकालच्या online जगात भाषण ऐकायला कोणाला वेळ नसतो. हेच जर आपण लिहून विचार मांडले तर वाचक ते आपल्या सवडीने वाचतात.यातून समविचारी वाचकांपर्यंत आपण पोचतो.लेखकांचे विचार लेखनाद्वारे पोचण्याचा reach वाढतो.
५) Call to action-
लेखन, वाचन, श्रवण, आकलन. लिहिताना आपण नकळत वाचत असतो, तेच ऐकत असतो आणि तेच आपला मेंदू पुन्हा आकलन (grasp) करतो. यामुळे आपले विचार आणि वागणं आपणच पडताळून पाहतो. विचार डोक्यात पक्के बसतात आणि त्यावर कृती घेतली जाते, ज्याला आपण call to action म्हणतो.
मग आता पटलं ना की आपण सगळेच लेखक असतो. फक्त कालपरत्वे आपलं लिखाण बंद झालं आहे. लेखनाचे हे ५ सकारात्मक फायदे आपल्याला नक्कीच आपल्या ध्येयाकडे घेवून जातात. मग कधी घेतात call to action? आज लिहिताय ना?
मी अक्षदा विचारे,तुमची Happiness coach तुमच्या मदतीला आहेच.लिहीते व्हा आणि आनंदी रहा.
मी अक्षदा विचारे,तुमची Happiness coach तुमच्या मदतीला आहेच.लिहीते व्हा आणि आनंदी रहा.
mail id: akshada.vichare@yahoo.com
fb : Akkshada Vichare


सुंदर ब्लॉग. छान विषय
उत्तर द्याहटवाछान ब्लॉग
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाPerfect Akshada. Very well written
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर विचार मांडले आहेत.विशेष म्हणजे सद्य परिस्थितीत आपल्या स्वतः मध्ये असलेले सुप्त गुण उत्तमप्रकारे विकसित होण्या साठी हा सुचवलेला मार्ग खरेच आपणही छान लिहू शकतो आणि आपलेआपणच स्वतःचे प्रश्न सोडवू शकतो ही जाणीव करून देणारा हा वरील लेख आहे.
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहला आहे ब्लॉग
उत्तर द्याहटवाखूप सुंदर प्रमाणे तुम्ही एक्सप्रेस करता तुमचे विचार मलाही ब्लॉग लिहायचा आहे पण अजून माहिती नाहीये कसं ते प्रयत्न चालू आहेत
उत्तर द्याहटवाGreat thought ...
उत्तर द्याहटवाछान माहितीपूर्ण मार्गदर्शन
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलंय तुम्ही, असेच लिहून पोस्ट करत जा
उत्तर द्याहटवाख़ुप छान ब्लॉग. आजच्या डिजिटल जगात आपण परावलंबी झालो आहोत.......फक्त वाचतो पण व्यक्त होत नाही......त्यासाठी लिहणे हा मार्ग आहे. Do share nice blogs.......Best wishes🙏
उत्तर द्याहटवा