मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदाचे ११ मूलमंत्र




मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग....


पण तत्पूर्वी मला सांगा की,
स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का?
आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का?
तुम्हाला एकट,एकाकी वाटत का?
मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का?

आपल्याला आनंद शोधायला का लागतो?
बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय.

याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत...

१) सूर्यप्रकाशात चाला-
सकाळच्या वेळी एक small break घेऊन सूर्यकिरण अंगावर घ्या.सूर्य हे उर्जा, शक्ती आणि सकारात्मकता यांचं प्रतीक आहे,ती आपल्यात सामावून घ्या.

2) स्वतःचा आवाज ऎका-
आपलं अंतर्मन आपल्याशी बोलत असत त्याच म्हणणं जरा शांत बसून एकदा ऐका तरी.एखादी राहून गेलेली कला जस गाणं,चित्रकला,नृत्य यासाठी थोडा वेळ काढा.


3) रोज दिवसभरात किमान एक चांगली गोष्ट करा-
छोटी असो का मोठी पण दिवस रोज एक चांगली गोष्ट करायचा संकल्प करा.जस की भुकेल्या माणसाला खायला द्या,पक्षांना पाणी द्या.-मिळाला ना आंनद?

४) स्वतःला आहात तसं स्वीकारा-
I am my favourite,मी या जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे -हे फक्त स्वतःला सांगू नका,ते स्वीकारा.


५) स्वतःला माफ करायला शिका-
माणूस म्हटलं की चुका होणारच.स्वतःला सतत perfection च्या तराजूत तोलू नका.बडे बडे शहरोमे ऐसी छोटी छोटी गलतीया तो होती ही रहती है-हा फक्त शाहरुख खानचा dialouge नाही तर हे प्रत्यक्षात अंगिकारायला सुरवात करा.

६) जेवण skip करायचं नाही-
'कामाच्या व्यापात खायलाच वेळ नाही मिळाला' ही सबब घातक आहे.एखाद फळ, सलाड, dryfruits जवळ ठेवा जे पटकन खाता येईल.


७) कामाच्या जागी आंनददायी वातावरण निर्माण करा-
घरी किंवा ऑफीसमध्ये कामाच्या जागी छान ताजी फुल,प्रसन्न चित्र आपली ऊर्जा वाढवते.



८)दिर्घ श्वास घ्या-
कामात असताना stress जाणवतो तेव्हा जरा थांबा आणि दिर्घ श्वास घ्या ज्यामुळे oxygen level वाढून fresh वाटत.

९) स्वतःसाठी खरेदी करा-
अगदी लहानशी वस्तू जस की एखादा रुमाल,पेन स्वतःसाठी म्हणून frequently घ्यायची. family साठी खरेदी करताना स्वतःसाठी पण budget ठेवा.नवीन shopping मुळे आपण re-energise होतो.


१०) स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या-
आपल्या जवळच्या माणसांना बर नसलं की आपण किती धावपळ करतो.किती काळजी घेतो आपल्या माणसांची.थोड स्वतःच्या तब्येतीकडे पण बघा.रोज ३० मिनिटं चाला,10 मिनिटं मेडिटेशन करा.तुमचं आरोग्य स्वस्थ तर तुमचं घर मस्त.


११) सकारात्मक व्यक्ती आणि विचारांच्या सानिध्यात राहा-
'नाही रे नाहीच होणार हे","नाहीच ग जमत मला" अशा विधानांपासून आणि व्यक्तींपासून दूर राहा.NOTHING IS IMPOSSIBLE WHEN YOU DESIRE यावर ठाम विश्वास ठेवा.

हे ११ मूलमंत्र आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारून आपण रोज नव्हे, प्रत्येक क्षणी आनंदी राहू शकतो.
आनंद आपल्या स्वतःमध्ये आणि चराचरात ठायीठायी भरला आहे.झाडं, पान,पक्षी,फुल,फुलपाखर,माणस-जिथे पाहावं तिथे आनंद आणि आनंदच आहे.संत तुकाराममहाराजांनी म्हटलंच आहे 'आनंदाचे डोही आनंद तरंग'.

काय मग,पटलं ना की आनंद हेच निरोगी जगण्याच healthy diet आहे. सुखी,उत्साही,आनंदी,सकस आयुष्य जगण्याची आणखी गुपित जाणून घेण्यासाठी मी अक्षदा,तुमची Happiness Coach तुमच्याबरोबर आहेच.

या blog ने तुमची positive energy channelise झाली असेलच.तर मग like, comment, share करा.
अधिक जाणून घेण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.
https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share

टिप्पण्या

  1. खूप छान वाटले आनंदाच्या गावात फिरून.

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच चॅन आहेत या टिप्स. किती छोट्या गोस्टी असतात पण आपल्या काही लक्षात येत नाहीत

    उत्तर द्याहटवा
  3. Well written,Pradnya. We all know these points to stay happy but in our mundane life we have simply ignored them. Thanks for reminding us.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप छान प्रज्ञा . किती सहज आणि सोप्या गोष्टी आहेत या . पण आपण बऱ्याचदा विसरून जातो thanks for reminding .

      हटवा
    2. Very true..dat's what I will b doing ...To remind and make i all take action

      हटवा
    3. Very true..dat's what I will b doing ...To remind and make i all take action

      हटवा
  4. Ho khara खूप छान.... मंत्र आहेत... Well expressed... Keep it up... अजून एक पाउल pudhe...

    उत्तर द्याहटवा
  5. Ho khara खूप छान.... मंत्र आहेत... Well expressed... Keep it up... अजून एक पाउल pudhe...

    उत्तर द्याहटवा
  6. Very nice.parmanand too you can get by being one with god and surrender to god totally and unconditionaly

    उत्तर द्याहटवा
  7. खूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  9. खूप छान. काही गोष्टी आपण follow करतो पण काही राहून जातात. त्या ही करणे खूप गरजेचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  10. नित्यानंद मिळवण्याचे सोपे मार्ग...

    उत्तर द्याहटवा
  11. अप्रतिम ... वाचनीय ... जीवन मंत्र 👍😊💐

    उत्तर द्याहटवा
  12. अक्षदा खूप छान. आम्हाला आनंदित केलस

    उत्तर द्याहटवा
  13. ब्लॉग खूपच सुंदर लिहिलेला आहे आणि आपल्या सर्वांस सकारात्मकता आणि निरोगी जीवनाकडे जाण्याचा मार्ग दाखवत आहे.

    उत्तर द्याहटवा
  14. वाक प्रज्ञाताई खूपच छान लेख किती सकारात्मक मार्ग दाखवला आहे

    उत्तर द्याहटवा
  15. प्रत्युत्तरे
    1. सगळ्यांना अस वागता येईल फक्त मनाचा निर्धार आणि सातत्य हवं yd...आणि मी आहेच न करून घ्यायला ...Happiness Coach.

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...