मुख्य सामग्रीवर वगळा
प्रेम.. राधा क्रुष्ण ...आणि स्पेस

प्रेम या विषयावर लिहायला राधा क्रुष्णच का निवडावेसे वाटले??
कारण त्यांच निर्वाज्य प्रेम आणि या नात्याविषयी एक कुतुहल

क्रुष्ण ...एक आदर्श मुलगा मित्र मार्गदर्शक ...भगवंत
पण राधेशी असलेल क्रुष्णाच नात सदैव मनाला भुरळ पाडत.

समस्त गोपिकांना भावणारा हा मुरलीधर त्यांच्यासंगे रास रंगतो, मीरेची भक्ती जाणतो, रुक्मिणीशी वचनबद्ध राहतो.

मला वाटत क्रुष्ण राधेचा 'सखा'...
जो तिला मनापासून ओळखतो नव्हे तिचा आदर करतो...तिच्या अडचणी निरसन करतो
आणि राधा प्रसंगी मैत्रीण कधी प्रेमिका कधी श्रुंगारिका कधी रती...कधी फक्त सखी
सर्व रुपात ती क्रुष्णाचा सन्मान करते...म्हणूनच रुक्मिणीशी divorce घेवून माझ्याशी लग्न कर असा हट्ट ती करत नाही
क्रुष्ण राधा यांची तसबीर पाहताना या नात्यातली एकरुपता मनाला भिडते.

हल्लीच वाचल की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक क्रुष्ण येतो फक्त तो जिचा तिने ओळखायचा ...
तसच प्रत्येक पुरुषाला पण एक राधा हवीच असेल..

कारण या नात्याची गोडीच एकमेकांचा सखा किंवा सखी होण्यात आहे, हो की नाही?
अक्षदा

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...

आनंदाचे ११ मूलमंत्र

मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग.... पण तत्पूर्वी मला सांगा की, स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का? आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का? तुम्हाला एकट,एकाकी वाटत का? मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का? आपल्याला आनंद शोधायला का लागतो? बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय. याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत... १) सूर्यप्रकाशात चाला- सकाळच्या वेळी एक small break ...