मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले
माझ्या ट्रेनमधली एक फेरीवाली मुलगी ...clips earrings विकणारी वय २२-२४ मधल(स्वत:च वयसुद्धा माहीत नाही तिला) ... पण हातात एक २ महिन्याच मुल.. सहज तिच्याशी बोलायला लागले तर समजल की हे तिच तिसर मुल...ह्रितिक मोठा मुलगा ७ वर्ष दुसरा ३ वर्ष.. घरी ठेवून येते... आता operation केलय म्हणाली... नशीब🙏🏼 अत्यंत मितभाषी लाघवी आणि गोड मुलगी ..आयुष्य जस आहे तस स्विकारलय..स्त्रीवर होणारा अन्याय self-respect कसलाच  गंध नाही. या मुलीची दया नाही येत,कौतुक वाटत -झालच तर काळजी वाटते.. काही जणी तिच्या या बाळाला संभाळतात आणि तेव्हा आमची ही हिरकणी डब्यात वस्तू विकते..आणि बाळालाही फिरायची सवय झालीय म्हणते चेहरा सदैव हसरा...सगळ्यांशी गप्पा मारत...आणि या बाळाच नाव ह्रितिक कारण याच्या हाताला ६ बोट आहेत....आहे न हुशार..😀😀 खरच समाज आणि स्री पुढारलेत, सुधारलेत?? संसाराच्या गाड्याला जुंपलेली एक गोड मैत्रीण ... आयुष्य आणि स्पेस समजलेली....   हिरकणी
प्रेम.. राधा क्रुष्ण ...आणि स्पेस प्रेम या विषयावर लिहायला राधा क्रुष्णच का निवडावेसे वाटले?? कारण त्यांच निर्वाज्य प्रेम आणि या नात्याविषयी एक कुतुहल क्रुष्ण ...एक आदर्श मुलगा मित्र मार्गदर्शक ...भगवंत पण राधेशी असलेल क्रुष्णाच नात सदैव मनाला भुरळ पाडत. समस्त गोपिकांना भावणारा हा मुरलीधर त्यांच्यासंगे रास रंगतो, मीरेची भक्ती जाणतो, रुक्मिणीशी वचनबद्ध राहतो. मला वाटत क्रुष्ण राधेचा 'सखा'... जो तिला मनापासून ओळखतो नव्हे तिचा आदर करतो...तिच्या अडचणी निरसन करतो आणि राधा प्रसंगी मैत्रीण कधी प्रेमिका कधी श्रुंगारिका कधी रती...कधी फक्त सखी सर्व रुपात ती क्रुष्णाचा सन्मान करते...म्हणूनच रुक्मिणीशी divorce घेवून माझ्याशी लग्न कर असा हट्ट ती करत नाही क्रुष्ण राधा यांची तसबीर पाहताना या नात्यातली एकरुपता मनाला भिडते. हल्लीच वाचल की प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक क्रुष्ण येतो फक्त तो जिचा तिने ओळखायचा ... तसच प्रत्येक पुरुषाला पण एक राधा हवीच असेल.. कारण या नात्याची गोडीच एकमेकांचा सखा किंवा सखी होण्यात आहे, हो की नाही? अक्षदा