गेले अनेक दिवस vaccination या विषयावर अनेक लेख, jokes, उलटसुलट चर्चा वाचल्यामुळे नकळत vaccination याविषयी भितीयुक्त कुतूहल मनात निर्माण झालं होत आणि अखेर आजचा दिवस उजाडला. आरोग्य सेतू वर आधीच registration केलं होतं.बोरिवलीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये सकाळी अत्यंत शिस्तबध्द रांग लावण्यात आली होती.रांग पाहून वाटलं, आता किती तास रांगेत उभं राहायला लागतयं कोण जाणे... सकाळी ९ वाजताच कामाला सुरवात झाली. रांग अगदी पटापट पुढे सरकत होती.आम्ही मुख्य हॉल मधे पोचलो तिथे बसायची सोय होती. सुमारे १० मिनिटातच आमचा नंबर आला आणि आम्ही कॉम्प्युटर entry ला पोचलो. Registrarion केलेला फोन नंबर सांगितला की आपलं registration दिसतं.मग आपला webcam ने फोटो आणि आधार scan होतं.आता मुख्य vaccination ! याविषयी तर काय न काय वाचलं होतं.पण प्रशिक्षित नर्सने vaccination इतकं हळूवारपणे दिलं की काही समजलच नाही.सोबत सगळ्या सूचना अगदी प्रेमाने सांगितल्या जात होत्या. शेेेेकायचं की नाही, paracetamol, crocin कधी घ्यायची इतक्या बारीक सारीक सूचना. Vaccination झालं की आपल्याला १५ मिनिट एका हॉलमध्ये बसवलं जातं आणि मग आपण घरी! ही सगळी ...