#newyearresolution
#goalsetting
नववर्ष, नवचेतना, नवउत्साह, नव-जल्लोष....
२०२० ला रामराम आणि २०२१ च स्वागत करायला सज्ज आहेत ना ?
आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू विकत घेतो तेव्हाही आपल्या मनाला आनंद होतो. शाळेतली नवीन पाटी, पुस्तक, वह्यांचा नवा कोरा वास, नवीन कपडे-तो शाळेतला नाविन्याचा गंध अजून दरवळतोय आणि आता तर एक अख्ख नवीन वर्ष चक्क १२ महिने अगदी कोरे करकरीत समोर आहेत तर मग नवीन संकल्प करायलाच हवा ना ?
मग काय केलेत संकल्प ?
काय म्हणता दरवर्षी संकल्प फक्त २ दिवस टिकतो?
पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' कधी होतं समजतच नाही?
चालढकल किंवा आळस कारणीभूत ठरतो?
तुमच्या बाबतीतही हे असचं होत असेल आणि "उद्या पाहू काय ते" हा dialouge २ किंवा ३ जानेवारीला म्हणत असाल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे.
म्हणून या problem वर solution मिळण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
माणसाला परमेश्वराने मेंदू दिला आहे जो विचार करतो आणि त्याला सातत्याने नवीन काहीतरी शिकायला आणि करायला आवडत. खरंतर ३१ डिसेंबर काय आणि १ जानेवारी काय, सूर्य तर रोजच उगवतो. पण नववर्ष हे नवीन सुरवात करायला एक निमित्त असतं.
संकल्पांमध्ये किती ताकद असते याच एक उदाहरण म्हणजे चोरांनी चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून दिल्यावर एक पाय गमावलेला असताना हॉस्पिटलमधेच एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करण्याचा संकल्प केलेल्या आणि तो पूर्ण केलेल्या अरुणिमा सिन्हा,आता जगातली उत्त्युच शिखरं पार करताना म्हणतात..
अभी तो इस बाजकी असली उड़ान बाकी है ..
अभी अभी तो मैंने लांघा है समंदरको -अभी तो पुरा आसमान बाकी है ...
संकल्प लहान असो कि मोठा पण तो सिद्धीस जाण्यासाठी नक्की काय करायला हवं ?
१.उद्दिष्टय स्पष्ट ठेवा -Focussed Goal

बर्ट्रांड रसेल म्हणतात,"प्राप्त्य परिस्थितीत एक निश्चित दिशा डोळ्यासमोर ठेवून आयुष्याला आकार देणारी माणसंच समाधान आणि आत्मसमाधान मिळवतात. सुखी जीवनासाठी निश्चित उद्दिष्ट्य असणे आवश्यक आहे."
संकल्प specific,कायमस्वरूपी आणि वास्तववादी असावेत. एका वेळी भारंभार संकल्प करण्यापेक्षा १ मुख्य संकल्प आणि त्याला उपयुक्त उप-संकल्प ते ही फक्त २ किंवा ३ बस! जसं आपला लाडका संकल्प वजन कमी करणे जो मुख्य संकल्प झाला.याला जोडून रोज walk ला जाणे,आहार संतुलित ठेवणे हे उप-संकल्प.
आता वजन कमी करणे हा झाला general संकल्प. हे म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' सारखं-झाला तर झाला-होईल कधीतरी.म्हणून मग ते specific करायचं -एक deadline हवी की किती दिवसात किती kg वजन कमी करणार आणि त्याचा एक chart हवा जो याच मोजमापन करेल, exercise मध्ये सातत्याने बदल करावा म्हणजे मग तो नियमितपणे केला जाईल,कंटाळा येणार नाही आणि मग आपलं target वजन साध्य केलं जाईल.
२. संकल्पपूर्तीचे अभिजात शत्रू -चालढकल Procastination-

डॉक्टर आनंद नाडकर्णी म्हणतात,"यश आणि अपयश या फक्त शक्यता आहेत.आपण सकारात्मक विचार करून प्रयत्न केले तर त्या शक्यतेचं रूपांतर दाट शक्यतेमध्ये होतं आणि नकारात्मक विचारांमुळे मन अडकत ते वाईटाचा खात्रीवर."
जर वाईटाचा अकारण विचार केला तर प्रयत्न, क्षमता आणि यश यांची सांगड घातली जाणार कशी?
आपले संकल्प केवळ २ ते ३ दिवसात संपुष्टात येतात असा तुमचा अनुभव असेल तर लक्षात ठेवा की याच कारण फक्त आणि फक्त आपणच असतो. होय,यासाठी इतर कोणालाही दोष देणं फक्त पळवाट आहे.'हिने मला सकाळी उठवल नाही म्हणून माझा walk राहीला','मित्राने आग्रह केला पार्टीसाठी म्हणून आज diet plan flop गेला.' या सबबी आहेत. अहो,संकल्प तुमचा आहे मग त्याची जबाबदारी पण तुमची आहे,बायकोची किंवा मित्राची नाही ना?
म्हणून सकारात्मक विचार,यशाची खात्री आणि आत्मविश्वास या संकल्पसिद्धीच्या आवश्यक पायऱ्या आहेत. सातत्याने ध्येयाकडे वाटचाल, सराव आणि त्यासाठी आपल्या जीवनशैलीत आवश्यक बदल यामुळे आत्मविश्वास वाढतो.'
३. कृती, सवय,आढावा -Action, Habit, Review-

आपण संकल्प तर केला,त्यामध्ये येणारे शत्रू पण समजून घेतले.
आता वेळ आहे कृतीची -रोज छोट्या छोट्या कृती करत जाव्या.जस वजन कमी करायचं तर एक दिवस ४ तास चालून ते कमी होणार नाही.तर रोज ४० मिनिट Walk घेणं ही कृती करायची. ही कृती सातत्याने केली की ती सवय बनते.अशा छोट्या छोट्या सवयीचं मग आयुष्यात बदल घडवतात.'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीनुसार आपल्या यशाकडे सातत्याने जाणीवपूर्वक वाटचाल हेच संकल्पसिद्धीचे गमक आहे.
संकल्प ते सिद्धी हा एक प्रवास आहे. याच मूल्यमापनही तितकचं महत्वाचं. एक महिन्यात समजा आपलं वजन २ kg कमी झालं कि स्वतःला एक छान gift द्यायचं कारण त्याने आपली प्रेरणा वाढते. हा review जर आपल्या एखाद्या साथीदाराने घेतला तर त्याला जास्त authenticity येईल.
बाबा आमटे म्हणत,"भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन त्या अमलात आणाव्यात."
तर मग आता मला सांगा की तुम्हाला विश्वास आहे ना की २०२१ च New Year Resolution पूर्ण होणार याची ?
गरज आहे ती फक्त एक पायरी चढायची- प्रत्येक दिवसागणिक,महिन्यागणिक तुमच्या संकल्पपूर्तीच्या शिखरावर पोचण्याच्या पायऱ्या आपोआप चढल्या जातील हे निश्चित!
तुमच्याबरोबर तुमच्या मित्र-मैत्रिणींनाही हा blog उपयोगी आहे ना ? मग like, share, comment आणि forward करा.
माझ akkshada vichare हे youtube channel subscribe करा.
'मनतरंग ग्रुप फेसबुकवर आहे तोही जॉईन करा

https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share
धन्यवाद, पुन्हा भेटूच..

वा, खूपच छान ब्लॉग
उत्तर द्याहटवाअप्रतिम
Thank you
God bless you
Thx uchit
हटवावा! खुपच मस्त अक्षता ताई नक्कीच सगळ्यांना हा ब्लॉग खूप महत्त्वाचा मार्गदर्शक ध्येय साध्य करण्यासाठी आहे. धन्यवाद
उत्तर द्याहटवाThx pranita tai
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाThank u
हटवाGood guidance for 2021👌 Nicely written👍
उत्तर द्याहटवा