मुख्य सामग्रीवर वगळा

ध्येयपूर्तीतून यशप्राप्तीचे ७ अफलातून fundas


मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आठवताहेत का ते college चे दिवस ? आपली स्वप्न, Career यावर canteen मध्ये रंगलेल्या चर्चा ? College संपलं. कोणी नोकरी, कोणी Business , कोणी professional . आणि मग आयुष्याच्या एका टप्यावर reunion झालं. तेव्हा असं लक्षात येत आपल्यातले काहीजण यशाची उंची गाठू शकले पण काही अजून धडपडताहेत. हे असं का? सुरवातीला तर सगळ्यांचा उत्साह, मेहनत, जिद्द सारखी होती.
मग पुढे काय झालं नक्की? 
सर्वसामान्यपणे १०० पैकी ५ लोक यशाच्या शिखरावर पोचतात. ते असं काय करतात जे उरलेले ९५ नाही करत?

या प्रश्नाचं उत्तर आहे Goal setting म्हणजेच ध्येय. यशस्वी माणसं आपल ध्येय ठरवतात आणि त्याबरहुकूम चालतात.


तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का हे ध्येय किंवा goal setting म्हणजे नक्की काय?

तुम्ही जरा confused आहात का की आयुष्यात गरज काय या Goal setting ची?

ध्येय आणि यश यांच काय connection आहे?

जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा ब्लॉग केवळ तुमच्यासाठीच आहे.

मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आयुष्यात ध्येय महत्वाची का असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणकोणते बदल घडू शकतात-

ध्येयपूर्तीतून यशप्राप्तीचे ७ अफलातून fundas


१) स्वतःच्या आयुष्याचा remote control स्वतःकडे ठेवा -



होय मित्रांनो, आपण जर आजूबाजूला पाहीलं तर बरेच लोक आपल आयुष्य जसं चाललंय,तसं चालवत असतात. ते खूप मेहनत करत असतात पण त्यांना काय हवंय त्याची दिशा ठरलेली नसते.आपण खूपदा असं बघतो की मुलं शिक्षण घेतात पण पुढे आपण काय करायचं हेच त्यांना कळत नाही.

बरीचशी माणसं आयुष्यभर नोकरी करतात ,व्यवसाय करतात पण तरीही आयुष्याच्या ३० किंवा ४०नंतर ही त्यांना माहीत नसतं की आता पुढे काय?

Bill Copeland says-When you dont set goals,you can spend your whole life running up and down and not achieve anything.

अगदी खरं सांगायचं तर बरेचदा आपण आपले ध्येय पूर्ण करण्याऐवजी दुसऱ्यांची ध्येय पूर्ण करत असतो.
जसं fast food products सांगत आहे म्हणून ते food आपण 'luving it' म्हणून खातो किंवा एखादा brand म्हणतो या shampoo मुळे तुमचे केस सरळ होतील आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो,एखादा fashion brand आपल्याला सांगतो हे कपडे तुम्हाला चांगले दिसतील म्हणून आपल्याला ते कपडे आवडतात.

आपण स्वत:ची ध्येय ठरवत नाही आणि दुसऱ्यांचा विचार करतो तेव्हा आपण आपल्या स्वत:च्या विचारांवरचा control काढून टाकतो आणि दुसऱ्यांच्या विचारांप्रमाणे वागतो.याउलट आपण जर स्वतःचे ध्येय ठरवलं तर मग आपण तोच विचार करतो, तेच करतो जे आपल्याला हव असत आणि म्हणूनच have remote control of your life in your hand.

२) Goal सेटिंग मुळे जास्तीत जास्त रिझल्ट्स मिळतात-



आपण जर जगातले Top performer बघितले किंवा यशस्वी माणसं बघितली -अगदी साधं उदाहरण म्हणजे झुकेरबर्ग आपला फेसबुक वाला-त्यानेही आपलं goal set केलं. कारण जेव्हा तुम्ही goal set करता तेव्हा तुम्हाला एक दृष्टी येते, त्या दृष्टीने तुम्ही प्रवास करायला लागता.

तुम्हाला माहीत असतं ते तुमचे प्रयत्न हे मापले जाणार आहेत,मोजले जाणार आहेत तेव्हा त्यात सुधारणा होते.

जर तुम्ही एखाद goal किंवा target set केलं नाही तर मग त्यातली प्रगती तुम्हाला कशी कळणार?
जर तुमच्या समोर काम करण्यासाठी काही target नसेल आणि तुम्ही प्रयत्न करत आहे, तुम्ही काम करताय पण मग त्याचा result कसा समजणार?

अस म्हटलं जातं की Shoot for the moon.Even if you miss it, you will land among the stars.
चंद्र नाही मिळाला तरी एक नक्की, ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू होते.

एक वर्षानंतर तुम्ही काय करणार आहात, तीन वर्षाच तुमचं ध्येय काय आहे आणि पाच वर्षानंतर goal set केलं की मग आपण त्या दृष्टीने विचार करतो आणि action घेतो. जरी आपल्याला goal साध्य करता नाही आलं तरीही आपण परत सुरवात करतो, पुन्हा एकदा विचार करतो आणि या वेळी आपल्या गाठीशी मागच्या वेळचा अनुभव सुद्धा असतो.

आता साधंच बघा ना, परीक्षा नसेल तर विद्यार्थी अभ्यास कशासाठी करणार ?तसेच आयुष्यात जर Goal ठेवल तर तीच आपली परीक्षा होऊ शकते आणि त्यासाठी आपण जास्त मेहनत करतो.

आणि कस आहे ना, प्रत्येक गोष्ट दोन वेळा होते.
प्रथम ती आपल्या डोक्यात होते आणि मग ती प्रत्यक्ष कृतीत उतरते. आपल्या विचारांमध्ये एखाद ध्येय ठरवलं जात तेव्हा आपोआपच त्याची physical action घेतली जाते.
 
मग जर आपली स्वप्न आपल्याला अस्तित्वात आणायची असतील तर सर्वप्रथम goal सेट करा आणि त्यादृष्टीने action घ्या.

३) Goal setting मुळे laser फोकस मिळतो-



आयुष्यात काहीतरी कारण असतं जगण्यासाठी, ज्यामुळे आपल्याला एक दिशा मिळते.पण जेव्हा आपण एखाद ध्येय किंवा लक्ष ठरवतो तेव्हा जशी लेझर किरण प्रभावीपणे काम करतात, त्याप्रमाणे आपण आपला वेळ आणि energy त्या ध्येयावर प्रभावीपणे पणाला लावतो.

म्हणजे समजा आपल्याला एक उद्योग चालू करायचाय जो pastries बनवण्याचा आहे. आता कदाचित pastry बनवण्याचा फारसा अनुभव तुम्हाला नसेल पण तुम्ही हे goal सेट केलेला आहे. आता तुमचा मेंदू त्याप्रमाणे काम करायला लागतो. तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता की इथे pastry च मार्केट कस आहे, त्याचा ब्रँड कसा आहे ,pastries कुठल्या प्रकारच्या लोकांना आवडतात, baking class कुठे आहेत, patries बनवून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना taste करायला देता आणि इथूनच तुमच्या व्यवसायाची सुरुवात होते.
माझ्या blog चे ५००० वाचक असावेत असं मला वाटत असेल तर अनेक प्रकारच्या लोकांमधून माझे blog कोण वाचेल,कोणाला माझ्या blog मध्ये जास्त interest असेल त्यांचा मी अभ्यास करेन आणि त्या दृष्टीने काम करेन.

जसं शाळेची परीक्षा असते ना तेव्हा आपण आधीच्या वर्षांचे पेपर बघतो, त्याचा सखोल अभ्यास करतो, अपेक्षित प्रश्नसंच वाचतो,टीव्ही बघत नाही,आपण अभ्यासाच टाईम टेबल करतो.तसंच प्रत्येक goal set केल्यामुळे ती साध्य करण्याचा प्रवास सुरु होतो.
तुमच्यातली ऊर्जा हे input असतो आणि result हे output असतात.Goal ठरलं की आपली ही जी ऊर्जा असते ती जागृत होते,जास्तीत जास्त चांगलं त्यात काय करू शकतो यावर लक्ष केंद्रीत होते.

४) जबाबदारीची जाणीव-


आता तुम्ही म्हणाल, goal setting आणि जबाबदारी चा काय संबंध आणि जबाबदारी कोण घेणार?
ही जबाबदारी आपली आपणच घेतो एकदा का मी माझं goal set केलं की मग माझं मी स्वतःच परीक्षण करणार किंवा स्वतः स्वतःच मूल्यमापन करणार.

अमुक एक दिवसानंतर मला हे करायचं होतं ते नाही झाले तर मी काय करायला पाहिजे ? तर माझा मार्ग बदलला पाहिजे ,माझी पद्धत बदलायला पाहिजे जेणेकरून मला ते target साध्य करता येतील.
मला blog writer म्हणून expert व्हायचं असेल तर प्रत्येक आठवड्याला माझा एक तरी ब्लॉक झालाच पाहिजे. हे नाही झालं तर मी स्वतः विचार करणार यासाठी मी काय करायला पाहिजे होते, इतर कुठल्या गोष्टी मध्ये लक्ष द्यायला पाहिजे, वेळ वाया घालवायला नको याकडे मी लक्ष देईन आणि त्यासाठी योग्य अभ्यास करेन, माझा target audience ठरवेन आणि असं केल्याने मी एक उत्कृष्ट blog writer होऊ शकेन.

५) Motivation मिळतं-


आपल्या आयुष्यात काहीतरी ध्येय असतं तेव्हा आंतरिक एक जी आपली इच्छाशक्ती असते ती प्रबळ होते. त्यामुळे काहीतरी करण्याची जिद्द वाढते. 
आयुष्यात जेव्हा काहीही ध्येय असतं तेव्हा आपण आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो आणि त्याकडे पोहोचण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो. तेव्हा आपल्यातील सकारात्मकता आपोआप जागृत होते. G0al आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्यासारख आहे.

जेव्हा आयुष्यात आपल motivation मिळतं नाही तेव्हा आपण meditation करावं आणि मग त्यामुळे आपलं पूर्णपणे त्या ध्येयाकडे ध्यानस्थ होतो आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागतो. आपल ध्येय आपण आधीच साध्य केलं आहे असं visualise करायचं. समजा माझ goal आहे की मला एक उत्कृष्ट blog writer व्हायचंय तर मी आत्तापासूनच स्वतःला imagine करणार की मी एक उत्तम blog writer आहे आणि त्यामुळे माझ्या आतील ऊर्जा त्या प्रकारे channelise होऊन मी ते ध्येय साध्य करणार.

६) स्वतःला उत्तम ते द्या- 


Goal setting मुळे आपल्यातली क्षमता वाढते.
जर आपल्या आयुष्यात ध्येय नसेल तर आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या त्या गोष्टी करत राहणार ज्यात आपण  खूप comfortable, relaxed असतो .पण मग आयुष्यात वाढण्याची किंवा ज्याला आपण growth, उन्नती म्हणतो त्याची क्षमता नक्कीच कमी होते. जेव्हा आपण goal ठेवतो तेव्हा त्याच्या दृष्टीने अर्थातच आपण वाटचाल करायला लागतो, आयुष्यात नवीन जागा,नवीन परिस्थिती आणि नवीन माणसं मिळतात. आपण normal पेक्षा जास्त केलं तर आपण आयुष्यात एका अशा उंचीवर पोचतो इथून पुढे यशाचा प्रवास सुरू होतो.

आपण आपल्या ध्येयासाठी समजा एक वेळ ठरवून दिली.. समजा मला १५ दिवसात २ किलो वजन कमी करायचं आहे तर मी उद्या सकाळी उठून walk करणार, diet करणार आणि त्यादिशेने माझी वाटचाल सुरू होणार.

७)  आपलं आयुष्य उत्कृष्ट जगा- 



शेवटच पण अत्यंत महत्वाचं-

ध्येय ठरवल्यामुळे आपण आपल्या आयुष्यात सगळ्यात स्वतःसाठी best life स्वीकारतो. 
आता असं बघा की आपली इच्छा असो की नसो, एक वर्षानंतर आपण एक वर्ष मोठे होणार, पाच वर्षानंतर आपण पाच वर्ष मोठे होणार. जर काही ध्येय ठरवलं नाही तर १ वर्ष तसेच जाणार, पाच वर्षे जाणार, ध्येयाविना आपण तिथंच आणि तसेच राहणार.

पण जर आपण एखाद्या goal च्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली तर या एक वर्षात किंवा पाच वर्षात आपल्याला जास्तीत जास्त अनुभव मिळणार आणि अनुभवांचा ठेवा किती प्रचंड सुंदर असतो हे सगळ्यांनाच माहीत आहे.

म्हणजे अगदी साधा विचार करा हे विश्व, जग अगणित आहे, अमर्यादित आहे. तिथे लाखो करोडो गोष्टी आहेत, त्यावर आपण विचार करू शकतो, लाखो अनुभव आपण घेऊ शकतो, अगणित माणसांना आपण भेटू शकतो.  आपण या जगात काय आणि किती मिळवू शकतो याला काही मर्यादा नाही. 
मग असं ठरवूया की या आयुष्यात जे काही करता येईल ते मी करणार, माणसांशी बोलता येईल तितकं बोलणार आणि जितके जास्तीत जास्त अनुभव घेता येतील तेवढे मी घेणार. कारण हे आयुष्य आपल्याला एकच मिळतं, पुनर्जन्म आहे की नाही आपल्याला कल्पना नाही. मग हे मिळालेल एक आयुष्य आपण संपूर्ण आनंदाने जगायलाच हवं आणि यासाठी जर आपण आपलं goal ठरवलं आणि त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली तर हे सगळे अनुभवही येणार आणि ध्येयपूर्तीचा आनंदही मिळणार.

तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या आयुष्यात goal किंवा ध्येययाचं काय महत्त्व आहे हे तुम्हाला नक्की कळलं असेल. Goal लहान असू देत की मोठं, ते साध्य झाल्याचा, त्या यशाचा आनंद ज्याचा त्यालाच समजतो आणि आपण आपलं पुढचं ध्येय आपणहून ठरवतो. 

म्हणूनच या यशाच्या प्रवासात आपलं स्वागत आहे. मग कधी ठरवताय तुमच १ वर्ष, ३ वर्ष, ५ वर्ष किंवा १० वर्षांचं goal?
त्यादिशेने वाटचाल करताना माझी साथ लागली की मी तुमची Happiness Coach अक्षदा तुमच्या सोबत आहेच. कारण तुमची ध्येयपूर्ती हाच माझा आनंद.
Remember - "You need plan to build a house.To build a life,it is even more important to have a plan or goal"-Zig Ziegler.

ध्येयपूर्तीतून यशप्राप्तीचे ७ अफलातून fundas आवडल्यास शेअर करा .

माझ akkshada vichare हे youtube channel subscribe करा.
'मनतरंग आणि 'पुन्हा हसूया,पुन्हा जगूया' हा खास महिलांसाठी ग्रुप फेसबुकवर आहे तोही जॉईन करा .
https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share
https://www.facebook.com/groups/punhajaguyapunhahasuya/?ref=share

पुन्हा भेटूच....



टिप्पण्या

  1. Akshada खूप छान लेख आहे. गोल setting is very important. You have explained it very well

    उत्तर द्याहटवा
  2. खरच खूपच छान सांगितले

    Goals are very important in our life
    We should set.

    उत्तर द्याहटवा
  3. वा, अप्रतिम ब्लॉग
    अतिशय छान पद्धतीने मांडलं आहे

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम लेखन . गोल सेटिंग चा पॉईंट खूपच छान मांडलात .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...

आनंदाचे ११ मूलमंत्र

मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग.... पण तत्पूर्वी मला सांगा की, स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का? आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का? तुम्हाला एकट,एकाकी वाटत का? मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का? आपल्याला आनंद शोधायला का लागतो? बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय. याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत... १) सूर्यप्रकाशात चाला- सकाळच्या वेळी एक small break ...