मुख्य सामग्रीवर वगळा

आनंदाच्या ८ scientific tricks




नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण हे पाहीलं की आनंदाचे अकरा मूलमंत्र काय आहेत, जे आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतात.

पण तुमच्या मनात अशी शंका आली आहे का की हा आनंद फक्त मनाची अवस्था आहे का ?
आनंद, मन आणि शरीर यांचं काही scientific relation आहे का त्यांच्यात काही chemistry आहे का काही समीकरण आहे का ?
जर हे प्रश्न तुम्हाला पडत असतील तर आजचा हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून ब्लॉग पूर्ण वाचा.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, देवाने माणसाला मेंदू दिलेला आहे.मेंदू विचार करतो,तो चौकस आहे आणि म्हणूनच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी
 तो मूल्यमापन करतो,नव्हे त्याची scientific कारण शोधतो आणि म्हणूनच मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला मन आनंदी ठेवण्याच्या ८ scientific tricks सांगणार आहे.

८) स्वतःला क्षणिक अपेक्षांमध्ये गुंतवा-



आयुष्यातल्या आनंदाच्या घटना जस की बर्थडे पार्टी ,मित्र-मैत्रिणींना भेटणं अशा छोट्या घटना expect करा. कारण असे events ठरवल्यापासून ते घडेपर्यंत आपण आनंदात असतो आणि त्यावेळी आपल्या शरीरातून positive hormone secret होत असतात म्हणून अशा छोट्या-छोट्या घटनांमध्ये आनंदाचे क्षण अनुभवा,enjoy करा.

७) एकावेळी एकाच प्रॉब्लेम चा विचार करा-



रोजच्या जीवनात आपल्याला अनेक problems येत असतात.आपला मेंदू त्या problem च solution शोधत असतो .यात मेंदूची खूप एनर्जी खर्ची पडते.

म्हणून जेव्हा आपण अनेक प्रॉब्लेम एकावेळी विचार करतो तेव्हा मेंदू थकतो आणि solution तर मिळत नाही फक्त frustration येत.एका वेळी फक्त एकच प्रॉब्लेम असा विचार केला तर मेंदूला neuro-transmitter चा डोस पुरवला जातो जो जास्त प्रमाणात असतो आणि त्यामुळे linguic energy release होते आणि प्रश्नाच उत्तर मिळतं असं सायन्स सांगतं

६) मनाला जे वाटतं ते बोलून मोकळे व्हा-



कधीकधी नात्यात मतभेद होतात,छोट्याश्या गोष्टीवरून वाद विवाद होतात आणि ती गोष्ट आपल्या मनात राहते. त्यामुळे मन विचार करत राहतो याचे पुढचे परिणाम काय होतील आणि त्या परिणामांची भीती आपल्या मनात राहते आणि negativity पसरते. त्यामुळे मनाला जेव्हा काही जाचतं तेव्हा बोलून मोकळं व्हायचं,चर्चा करायची त्यामुळे serotinine नावाच hormone secret होतं जे शरीराला सकारात्मकता पुरवतं आणि problem च solution मिळतं.

५) स्पर्श थेरेपी-



माणूस हा सामाजिक प्राणी आहे.स्पर्शाने अनेक आजारही दूर होतात.शारीरिक जखम होते तेव्हा आपल्याला वेदना होतात, तसंच स्पर्शाविना आयुष्य जगायला लागलं तर मनाला तशाच वेदना होतात. त्यामुळे मूड खराब होतो आणि ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. त्यामुळे स्पर्श या थेरपीचा वापर केला जावा.

४) सतत नवीन शिकत राहा-



नवीन भाषा ,नवीन कला काहीतरी शिकत रहा.कारण जेव्हा मेंदूला नवीन information 
मिळते तेव्हा आपला मेंदू ती माहीती ग्रहण करतो. त्याच्यासाठी ते नवीन वातावरण असतं. अशावेळी dophamine नावाचं happiness hormone secret होतं आणि त्यामुळे आनंदाची ऊर्जा  निर्माण होते .

३) Exercise-
 



Yoga, walking यामुळे आपल्या शरीरात stress निर्माण होत आणि ते रिलीज होत तेव्हा endophine नावाचं hormone pitutary gland मधून secretion होतं. या हार्मोनमुळे pain release होतं आणि आपल्याला आनंद मिळतो, ऊर्जा मिळते. रोज 25 मिनिटे चालण पुरेस आहे. प्रसिद्ध लेखक, composer हे चालण्याचा व्यायाम करतात ज्यामुळे त्यांची creativity वाढते असं त्यांना वाटतं.

२) चांगली झोप घ्या-



६ ते ८ तास झोप शरीराला जरुरी असते. काळोखात झोप घेण महत्वाचं. 
दिवसा झोपत असाल तर sleep mask लावा, काळोख करा.कारण काळोख केल्यानंतर आपल्या शरीरातून melotinine नावाच hormone secret होतं जे झोपेसाठी जरुरी असतं .म्हणूनच झोपण्याच्या एक तास आधी मोबाईल हातात घेऊ नये,लॅपटॉप पासून लांब राहावं.कारण त्याचे जे rays येतात त्यामुळे हे hormone secretion होत नाही आणि आपल्याला उशिरापर्यंत झोप येत नाही.रात्री व्यवस्थित झोप लागली की सकाळी serotinine hormone secreation पुरेसं होत आणि दिवस ताजातवाना जातो.

१) कृतज्ञता व्यक्त करा -



एखादी व्यक्ती, परिस्थिती, क्षण यांचे आभार माना. यामुळे आयुष्यात एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो .
आज मला हे जेवण मिळाल,मला श्वास घेता येतो याबद्दल आभार माना.कारण मग त्या श्वासांची किंमत जास्त वाटते यामुळे serotinine hormone च योग्य प्रमाणात secretion होत आणि दिवस आनंदात जातो.

या आनंदाच्या ८ scientific tricks तुम्हाला आवडल्यास शेअर करा .

माझ akkshada vichare हे youtube channel subscribe करा.

'मनतरंग आणि 'पुन्हा हसूया,पुन्हा जगूया' हा खास महिलांसाठी ग्रुप फेसबुकवर आहे तोही जॉईन करा .
https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share
https://www.facebook.com/groups/punhajaguyapunhahasuya/?ref=share

हसत रहा, मजेत रहा, आनंदी रहा.



टिप्पण्या

  1. Khup simple n easy yips thank you
    Thank u for making me happy
    As i was reading..
    I was visualising myself happy

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पांघरुन मिठी तुझी शांत मी विसावले सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले तू दिलेल्या आरशात मी तुलाच पाहीले अन अडकलेल्या श्वासात माझ्या मी तुलाच जाणले तू इथे अन तू तिथे तुजविण मी नच भासले अन सांग ना सख्या कसे अधर हे ओलावले

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल

लेखनाने आयुष्यात होणारे ५ सकारात्मक बदल नमस्कार लेखकहो, आता तुम्हाला अस वाटल ना की हा ब्लॉग फक्त लेखकांसाठी आहे? तर थांबा. मी हा ब्लॉग त्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहीते आहे ज्या व्यक्तीने आयुष्यात कधी ना कधी आपले विचार लिहीले आहेत. म्हणून हा ब्लॉग प्रत्येकासाठी आहे कारण शाळेत किमान आपण निबंध-लेखनात आपले विचार व्यक्त केले आहेत. माणूस सर्वसाधारणपणे दिवसाला ६०००० विचार करतो जे सकारात्मक किंवा नकारात्मक असतात. या विचारांमध्ये अनेकदा आपल्याला काही कल्पना सुचतात.पण आपण त्या काही वेळाने विसरून जातो.लेखन ही परमेश्वराने मानवाला दिलेली देणगी आहे.कशी?? ते समजून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. १) विचारांना मूर्त स्वरूप येते - दिवसभरात मनात काही ना काही संकल्पना येतं असतात.त्या जर आपण लिहून ठेवल्या तर त्यातून काहीतरी मार्ग मिळतो.या संकल्पना कदाचित व्यवसायाशी निगडित असतील किंवा आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित असतील त्या जरूर टिपून ठेवा. यासाठी नेहमी सोबत एक छोटं notepad आणि पेन ठेवू शकतो किंवा मोबाईल मधे notepad मध्ये पॉइंट्स लिहून ठेवायचे आणि शांतपणे बसल्यावर ते विस्तृतपणे मांडायचे. २) प्रश्नांच...

आनंदाचे ११ मूलमंत्र

मला सांगा तुम्ही शेवटचं मनापासून खळखळून कधी हसला आहात,आठवतंय का? आजकालच्या या टेन्शनच्या,धकाधकीच्या आयुष्यात आपल हसणं,आनंद अनुभवणं खूप दुर्मिळ झालंय.खर तर आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सगळ्यांना सारखी दिली आहे.फक्त तो मिळवण्याचा मार्ग आपल्यावर सोपवला आहे.जगण्याच्या धडपडीत आपण हा आंनदाच गाव गमावून बसलोय.काय म्हणताय आनंदाचा गाव कुठे आहे ? कस जायचं या गावी?त्याच मार्गावर तुम्हाला घेऊन जाणार आहेत हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटात..चला तर मग.... पण तत्पूर्वी मला सांगा की, स्वतःच्या भावना व्यक्त करण तुम्हाला कठीण वाटत का? आनंदी राहायला तुम्हाला कारणं शोधावी लागतात का? तुम्हाला एकट,एकाकी वाटत का? मला इतरांसारख चांगल काही करायला जमत नाही अस तुम्हाला वाटत का? आपल्याला आनंद शोधायला का लागतो? बदलत्या जीवनशैलीमुळे आपली जगण्याची पद्धत बदलली.आहार,झोप या मूलभूत गरजा बदलल्या,नात्यांची समीकरण बदलली.भौतिक वस्तू म्हणजे सुख हीच सुखाची व्याख्या झालीय.स्वतःला ओळखण्यासाठी आता outsourcing करावं लागतंय. याला उपाय म्हणजे हे ११ मूलमंत्र फक्त ११ मिनिटांत... १) सूर्यप्रकाशात चाला- सकाळच्या वेळी एक small break ...