
माझ्या जगण्याचं उद्दिष्ट काय ?
मी आयुष्यात मला पाहिजे ते सगळं मिळवलं आहे का ?
माझं आयुष्य improve करण्यासाठी मला काय करायला हवं ?
हे प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकालाच पडतात.तुम्हालाही कधी ना कधी पडले असतीलच.
या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
आयुष्यात काही वेळा आपल्याला आपलं ध्येय माहित असतं पण त्यापर्यंत पोचण्याचा मार्ग सुचत नसतो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,हा साथीदार आहे Life Coach जो तुमच्याशी बोलून, तुमच्यातली कौशल्यं शोधून तुमच्या स्वप्नांना दिशा देतो.
मी अक्षदा तुमची Happiness Life Coach आज तुम्हाला सांगते आहे तुमच्यातली अशी ७ कौशल्यं जी तुम्हालाच माहीत नाहीत पण जी तुम्हाला तुमच्या यशाचा मार्ग दाखवतात.
१) आयुष्याचं उद्दिष्ट शोधणे-

आपल्याला आपल्या आयुष्यात काही न काही विशेष करायचं असत. क्षेत्र कोणतंही असो त्यात मनाला समाधान हवं असत. आपण जगाच्या कामी यावं असं वाटत असत.पण नक्की काय हे समजत नसत. आम्ही Life Coach तुम्हाला यात मदत करतो.
कधीतरी तुम्ही काही गरजू व्यक्तींना मदत केली असते,जसं की आजारी माणसाला डॉक्टर कडे नेणं आठवा तेव्हा तुम्हाला खूप समाधान मिळालं होत. काळाच्या ओघात हे विसरून गेलात.
आम्ही Life Coach तुमच्यातील ही तुमची समाजाला मदत करण्याची उर्मी,क्षमता तुमच्या लक्षात आणून देतो, प्रश्न आणि tools च्या साहाय्याने. तुम्ही सध्या जे करत आहेत त्या जोडीला तुम्ही वेळ काढून इतरांना मदत करण्याचं सामाजिक कार्य सुरु करता आणि जास्त आनंदी होता.
२) तुमच्यातल्या तुम्हाला ओळखणे-

तुम्हाला स्वतःलाही कल्पना नसेल तुमच्यात काय Potential आहे. पण Life Coach ते तुम्हाला शोधून देतो. Life Coach खूप सकारात्मक आणि प्रोत्साहन देणारा मित्र असतो. तुम्हाला प्रश्न विचारून तो तुमच्यातले गुण,talent वर तुम्हाला विचार करायला लावतो आणि अनेकदा स्वतःच्या hidden telents शी तुमची नव्याने ओळख होते आणि बरं का ,हे सगळं तुमचं तुम्हीच शोधता.आम्ही Life Coach फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःशी संवाद घडवतो. आहे ना interesting?
३) स्व-सुधारणेच्या पायऱ्या चढणे-

एकदा का तुम्हाला तुमचं ध्येय समजलं कि खरी सुरवात होते ते साध्य करायच्या मार्गाची.
आम्ही Life Coach तुम्हाला कृतीचा तक्ता करायला मदत करतो. समजा तुमचं ध्येय आहे कॅन्सर रुग्णांसाठी पुस्तक लिहीणं तर यात -
पहिली पायरी याविषयावरची प्रकाशित पुस्तकांची माहीती घेणं,
दुसरी पायरी पुस्तक लेखनाला सुरवात,
तिसरी पायरी मुखपृष्ठासाठी चित्रकार शोधणे,
चौथी पायरी प्रकाशनाचे मार्ग,
या प्रत्येक पायरीवर Life Coach तुमच्या सोबत असणार नव्हे दर १५ दिवसांनी कामाचा आढावा घेणार. आता असं कोणी तुमच्या कामात रस घेऊन तुम्हाला push करणार तर नक्कीच हुरूप वाढेल ना ?
४) ध्येयप्राप्तीसाठी पद्धतशीर रूपरेषा आखणे-

Life Coach तुम्हाला पुस्तक लिखाणासाठी dead-line ठरवायला सांगणार आणि त्याचा सतत review घेणार.समजा महिन्यातून एकदा Life Coach बरोबर session आहे तर मागच्या session ला काय ठरलं होत,ते किती पूर्ण झालं हे Life Coach अगदी plan करणार,तुमच्या अडचणींवर मार्ग काढायला तुम्हालाच सांगणार. घाबरू नका,हे अगदी खेळीमेळीत,मित्राशी बोलावं इतक्या सहज गप्पागप्पात होतं.
आता हे सगळं एखादा मित्र करू शकेल की,हाच विचार आला ना मनात ? पण खरं सांगा त्यात किती seriously ध्येय साध्य होईल?
अहो,Life Coach तटस्थपणे तुमच्या project साठी तुम्हाला विचार करायला लावतो आणि प्रत्येक पायरीवर मैत्रीच्या नात्याने साथ देतो.
५) स्वप्न सत्यात उतरवणे -

बरेचदा तुम्हाला काही न काही करायचं असतं.स्वप्न तर असतात पण ती सत्यात उतरायला कठीण जात,अडचणी येतात. आम्ही Life Coach यात तुम्हाला मदत करतो.
समजा तुम्हाला Pets साठी foster house काढायच आहे.पण तुम्ही नोकरी करता म्हणून ते शक्य वाटत नाही.अशा वेळी Life Coach शी बोलताना तुम्हाला स्वतःलाच मार्ग सुचत जातात आणि तुम्ही ठरवता कि एक मदतनीस ठेवून Pets साठी foster house सुरु करायचं आणि तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही तिकडे काम करता. काम आवडीचं असल्याने वेळ मिळत जातो आणि कदाचित मग तेच तुमच्या आयुष्यच ध्येय होतं.
अर्थात हे तुम्हाला जाणवून देतो आम्ही Life Coach.
६) तुमची personal cheerleader -

क्रिकेटच्या मैदानावर त्या cheerleader पाहून कसं छान वाटतं ना? त्या खेळाडूंना प्रोत्साहीत करतात आणि त्यामुळे मन प्रसन्न होत,कामाची quality सुधारते.
अशी एक personal cheerleader असेल तर?
आम्ही Life Coach हेच करतो,तुम्हाला प्रोत्साहीत करतो, तुमच्या स्वप्नांची पूर्तता करताना तुमच्या सोबत चालतो कारण तुमची सफलता हाच आमचा आनंद असतो.
७) स्वतःची ओळख आणि आत्मविश्वास वाढणे-

उदाहरण:मीना स्वतःला चांगली आई समजत नाही.खरं तर ती आई म्हणून सगळं करत असते.
Life Coachशी बोलताना लक्षात येतं की मीनाची आई टापटीप ठेवणारी, उत्तम cook, आदर्श आई.
मीनाच्या मनात लहानपणापासून हे पक्के ठसलं होत की आईसारख व्हायचं. पण नोकरी सांभाळून तिला आईइतकं परफेक्ट असण जमत नव्हतं आणि म्हणून आपण चांगली आई नाही असं तिच्या मनाला बोचणी लागून राहीली होती अनेक वर्ष. Life Coach ने मीनाला स्वतःला ती करत असलेल्या सगळ्या गोष्टींची जाणीव करायला लावली आणि मीनाच्या मनातून हा न्यूनगंड नाहीसा झाला.एक नवीन तजेलदार आयुष्य ती जगू लागली.
तात्पर्य, तुम्हाला माहीत नसलेल्या तुमच्या क्षमतेची ओळख आम्ही Life Coach करून देतो ज्यायोगे तुमच्या मनातील blocks,न्यूनगंड नष्ट होऊन एक नवीन स्वतःची ओळख मिळते आणि जीवनाला कलाटणी मिळते.
आयुष्याला नवीन दिशा मिळते आणि आयुष्य जास्त आनंदी,सुखदायक होतं.
हा ब्लॉग तुम्हाला माहीतीपूर्ण वाटला असेलच तर like, share करा. आणि स्वतःला ओळखायला,
ध्येयसाध्य करायला Life Coach ला म्हणजे मला नक्की संपर्क साधा.
अधिक जाणून घेण्यासाठी माझा फेसबुक ग्रुप जॉईन करा.https://www.facebook.com/groups/manatarang/?ref=share
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाKhupach chhan
उत्तर द्याहटवाखूपच छान
उत्तर द्याहटवाप्रत्येकाने वाचावा व अभ्यासावा असा लेख