तेरे बिना तेरे बिना जिंदगी अधुरीसी क्यों है.. के मोहोब्बत में अब भी मेरे खलीश क्यों है.. तेरे कदमो की आहटसे मैं अब मचलती नहीं, तेरे सासों की गरमी मुझे अब तडपाती नहीं, फिर भी न जाने ये चुपी-सी क्यों है.. तेरे बिना जिंदगी अधुरीसी क्यों है.. के मोहोब्बत में अब भी मेरे खलीश क्यो है.. वैसे तो जिंदगी की रफ्तार रुकी नहीं, और जिंदगी को अब तेरी गुंजाईश तक नहीं, फिर भी तेरे लबों पे मेरे नाम की कशिश क्यों है.. तेरे बिना जिंदगी अधुरीसी क्यों है.. के मोहोब्बत में अब भी मेरे खलीश क्यों है. अक्षदा
आज सकाळी caligraphy master अच्युत पालव यांनी स्वलीखित एक संदेश पाठवला. प्रश्न माझा होता तरीही उत्तर सापडत नव्हतं उत्तर सापडलं तेंव्हा प्रश्नच उरला नव्हता आणि माझी विचार शृंखला सुरू झाली.आपल्याला रोज काही ना काही प्रश्न पडत असतात, कधी कधी भेडसावत असतात. आता हे प्रश्न पालव सरांनी म्हटल्याप्रमाणे माझे म्हणजे आपले स्वतःचे असतात.कधी ते मोठ्या स्वरूपाचे असतात जसे की नोकरी बदलावी का? तर कधी रोजच्या आयुष्यातले म्हणजे आज भाजी कोणती करावी ? काही प्रश्न लगेच सुटतात. जसे भाजी कोणती करावी? तर भाजी वांगी किंवा बटाटा करावी हा प्रश्न पटकन सुटला. नोकरी बदलावी का? हा प्रश्न सुटायला कदाचित ३-४ महीने लागतील. पण काही प्रश्न मात्र सुटता सुटत नाहीत.जसे कदाचित आरोग्यविषयक प्रश्न सुटायला नक्कीच जास्त वेळ लागतो. काही प्रश्नांची उत्तर मिळेपर्यंत त्या प्रश्नाची तीव्रता कदाचित कमी झालेली असते किंवा त्या प्रश्नाचं कारणच निघून गेलेलं असतं. उत्तर सापडलं तेंव्हा प्रश्नच उरला नव्हता. आता हे प्रश्न का पडतात तर मानवी मन विचार करत म्हणून, मानवी मन दुसऱ्याशी तुलना करत म्हणून, मानवाला मन आहे म्हणून. प्रश्न पडणं हे अर्थातच च...