मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फक्त ३ पायऱ्या - Welcome New Year Resolutions & Bye-bye procastination.

  #newyearresolution #goalsetting नमस्कार मंडळी,  नववर्ष, नवचेतना, नवउत्साह, नव-जल्लोष.... २०२० ला रामराम आणि २०२१ च स्वागत करायला सज्ज आहेत ना ? आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू विकत घेतो तेव्हाही आपल्या मनाला आनंद होतो. शाळेतली नवीन पाटी, पुस्तक, वह्यांचा नवा कोरा वास, नवीन कपडे-तो शाळेतला नाविन्याचा गंध अजून दरवळतोय आणि आता तर एक अख्ख नवीन वर्ष चक्क १२ महिने अगदी कोरे करकरीत समोर आहेत तर मग नवीन संकल्प करायलाच हवा ना ? मग काय केलेत संकल्प ? काय म्हणता दरवर्षी संकल्प फक्त २ दिवस टिकतो? पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' कधी होतं समजतच नाही? चालढकल किंवा आळस कारणीभूत ठरतो? तुमच्या बाबतीतही हे असचं होत असेल आणि "उद्या पाहू काय ते" हा dialouge २ किंवा ३ जानेवारीला म्हणत असाल तर हा ब्लॉग फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणून या problem वर solution मिळण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. माणसाला परमेश्वराने मेंदू दिला आहे जो विचार करतो आणि त्याला सातत्याने नवीन काहीतरी शिकायला आणि करायला आवडत. खरंतर ३१ डिसेंबर काय आणि १ जानेवारी काय, सूर्य तर रोजच उगवतो. पण नववर्ष हे नवीन सुरवात करायला एक निम...