मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आठवताहेत का ते college चे दिवस ? आपली स्वप्न, Career यावर canteen मध्ये रंगलेल्या चर्चा ? College संपलं. कोणी नोकरी, कोणी Business , कोणी professional . आणि मग आयुष्याच्या एका टप्यावर reunion झालं. तेव्हा असं लक्षात येत आपल्यातले काहीजण यशाची उंची गाठू शकले पण काही अजून धडपडताहेत. हे असं का? सुरवातीला तर सगळ्यांचा उत्साह, मेहनत, जिद्द सारखी होती. मग पुढे काय झालं नक्की? सर्वसामान्यपणे १०० पैकी ५ लोक यशाच्या शिखरावर पोचतात. ते असं काय करतात जे उरलेले ९५ नाही करत? या प्रश्नाचं उत्तर आहे Goal setting म्हणजेच ध्येय. यशस्वी माणसं आपल ध्येय ठरवतात आणि त्याबरहुकूम चालतात. तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का हे ध्येय किंवा goal setting म्हणजे नक्की काय? तुम्ही जरा confused आहात का की आयुष्यात गरज काय या Goal setting ची? ध्येय आणि यश यांच काय connection आहे? जर हे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा ब्लॉग केवळ तुमच्यासाठीच आहे. मी अक्षदा,तुमची Happiness Coach आज तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आयुष्यात ध्येय महत्वाची का असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात कोणकोण...